सोलापूर,(प्रतिनिधी):- दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 90 किलोमीटर कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा फिनिश करणाऱ्या 13 रनर्सचा गौरव 14 वेळा कॉम्रेड मॅरेथॉन फिनिश केलेले मुंबईचे सुप्रसिद्ध कॉम्रेड कोच सतीश गुजारन यांच्या हस्ते करण्यात आला.

हा कार्यक्रम 20 जुलै 2025 रोजी वाघचवरे एक्सीडेंट हॉस्पिटल, जुळे सोलापूर येथे अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला .
यावेळी उपस्थित रनर्स व सोलापुरातील सायकलिस्ट यांचे स्वागत डॉ. शुभांगी वाघचवरे यांनी केले तर सर्व कॉम्रेड मॅरेथॉनर्स ची ओळख डॉ.राजश्री वाघचवरे यांनी करून दिली.
यामध्ये सांगलीचे अमित पेंडुलकर , स्वरूप पुजारी,
इचलकरंजीचे सचिन बोरसे, इंडपूरचे संतोष वाघचवरे, संदीप जाधव, गोपीनाथ मोरे, पंढरपूरचे भारत ढोबळे, रवींद्र नागणे , बार्शीचे अनिल कांबळे , पुण्याच्या डॉ.स्मिता राहुल झांजुर्णे,आणि सोलापूरचे डॉ.अभिजीत वाघचवरे, डॉ. सत्यजित वाघचवरे बंधू या सर्वांचे कार्यक्रमाच्या सुरुवातीला मानाचे फेटे बांधून व गुलाब पाकळ्याची उधळण करून स्वागत करण्यात आले. प्रत्येक कॉम्रेड मॅरेथॉन फिनिशर्स यांनी आपला अनुभव सांगितला ते ऐकताना सोलापुरातील सर्व रनर्स व सायकलिस्ट उत्साहीत झाले होते .
सर्व कॉम्रेड फिनिशर्सला डॉ.
वाघचवरेंकडून एक सुंदर कॉम्रेड फिनिशर्सचे सन्मान चिन्ह व सोलापूरची ओळख असलेली उबदार चादर देऊन गौरविण्यात आले.
” लांब पल्याच्या रनिंग मध्ये वेगापेक्षा संयम, टेक्निक व सातत्य महत्त्वाचे आहे तरच आपण खूप काळ ईंजुरी फ्री रनिंग करू शकतो. पर्यायाने आपले शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते” असे भारतातील सुप्रसिद्ध कॉम्रेड कोच सतीश गुजारन यांनी उपस्थित धावपटूंना मार्गदर्शन करताना सांगितले.
यावेळी सोलापूरच्या डाॅ.
वाघचवरे भावंडांचा मॅरेथॉन रनिंग चे “वर्ल्ड रेकॉर्ड” झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून शनिवारी सोलापुरातील सर्व महिला सायकलीस्टना व रनर्सला आयर्न मॅन व कॉम्रेड फिनिशर असलेल्या पुण्याच्या डॉ. स्मिता राहुल झांजुर्णे / वाघचवरे यांचे ‘ महिलांनी त्यांच्या व्यस्त कौटुंबिक व्यापातून स्वतःचे शारीरिक व मानसिक आरोग्य कसे चांगले राखावे व त्यासाठी कसा वेळ द्यावा या संदर्भात मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार डॉ. अभिजीत वाघचवरे यांनी व्यक्त केले
