नाभिक समाज सेवा प्रतिष्ठानच्या महिला मंडळाचा हळदी कुंकू समारंभ अपूर्व उत्साहात साजरा

सोलापूर :  श्रीवास्तव नाभिक समाज सेवा प्रतिष्ठानच्या महिला मंडळाने आयोजित केलेला हळदी कुंकू समारंभ अपूर्व उत्साहात पार पडला.

अडथळ्यांची तमा न बाळगता नटून थटून आलेल्या महिलांच्या अपार उत्साहाला, त्यांच्या लक्षणीय उपस्थितीला आणि एकजुटीला सलाम करण्यासाठी शुभशकुन ठरलेला पाऊस कार्यक्रमाआधिच धो- धो बरसला.

सदर बझार – लष्कर येथील आधार केंद्रात संपन्न झालेल्या या  समारंभाला सीमाताई यलगुलवार, डॉ. विनयरेखाताई म्याकलवार, डॉ. माधुरीताई पारपल्लीवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली तर अल्काताई ताटे, भारतीताई हडपाद, सुनीताताई दळवी, शारदाताई श्रीमंगले, पुष्पाताई महाराज यांनीही संबोधित केले.

मंडळाच्या अध्यक्षा साधनाताई हिरापुरकर यांनी सर्वांचे स्वागत करुन कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. मंडळाच्या प्रदेश निमंत्रक वनिताताई मालतुमकर यांनी सेवा प्रतिष्ठान आणि महिला मंडळाचे कार्य, पुढील वाटचालीची दिशा उलगडून सांगत सर्वांनी मिळून जिद्दीने समाजाचा विकास साधला पाहिजे असे म्हणाल्या तेव्हा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दर्शविला.

वक्त्यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे कार्यक्रम, बचत गट, महिला सक्षमीकरण धोरण, महिला सुरक्षा यावर भर देणारी समयोचित भाषणे केली. आधार केंद्राच्या सुजाता बत्तुल, ॲड.रेखा गोटीपामुल यांनीही केंद्राच्या कामकाजासह त्या अंतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सखी वन स्टॉप सेंटर – (पिडीत महिलांसाठी मदत केंद्र) याची सविस्तर माहिती दिली.

यावेळी महिला- भगिनींची लक्षणीय उपस्थिती होती. त्यात प्रामुख्याने  वैशालीताई एक्केली,  मीराताई श्रीयाळ, जयश्रीताई म्याकलवार, रूपाताई म्याकलवार, आशाताई म्याकलवार, मधुताई म्याकलवार, सारिकाताई म्याकलवार, विनिताताई म्याकलवार, किरणताई, मालतूमकर, कलावतीताई हिरापुरे, रेखाताई मालतूमकर, ललिताकाकू मालतुमकर, वंदनाताई मालतूमकर, ज्योतीताई मालतूमकर, सिधम्माताई चिंताकींदी, निलमताई मालतुमकर, मिनाताई म्याकलवार, शांताताई भरतनूर, शशिकलाताई मालतुमकर, दिपालीताई श्रीमंगले, पुष्पाताई काळे, ललीताताई नलावडे, सुनिताताई श्रीमंगले, प्रितीताई श्रीमंगले, जयश्रीताई सर्दनकर, स्वरुपाताई कोडपाक, अरुणाताई म्याकलवार, सरस्वतीताई सर्दनकर, अन्नपूर्णाताई सर्दनकर, मंगलताई सर्दनकर, सुरेखाताई कोडपाक, शोभाताई सर्दनकर, स्वरुपाताई सर्दनकर,रुपालीताई वड्डेपल्ली, अनिताताई  श्रीमंगले, अरुणाताई मॅकलवार, अरुणाताई ऐकेल्ली, अनुराधाताई चिंताकिंदी, मीनाक्षीताई मॅकलवार, शालनबाई जोगीपेठकर, राजुबाई दोंतूल, शांताबाई  बिराजदार  कलावतीताई हिरापुरे, सुनीताताई रायसुरकर, नागमणीताई कंकनाळ, शांताबाई कानागड्डी, अनुराधाताई म्याकलवार, नागेश्वरीताई फरीदाबादकर, यलेश्वरीताई नल्ला, सुनंदाताई चिंताकिंदी, अर्चनाताई चिंताकिंदी आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *