चंद्रग्रहणाची सुरुवात रविवारी रात्री 9.58 वाजता होणार

सूतक काल 9 तास आधी 12.57 वाजता  लागणार:

Chandra Grahan 2025 : Sunday, 7th Sept.2025

By The Solapur ||

Chandra Grahan 2025: चंद्र ग्रहणाची सुरुवात रविवार, दि. 7 सप्टेंबर रोजी रात्री 9.58 वाजता होणार आहे. रात्री 1.26 वाजता चंद्र ग्रहणाची  समाप्ती होणार आहे.

चंद्र ग्रहणाचे सूतक काल (sutak period) 9  तास आधी अर्थात दुपारी 12.57 वाजता सुरू होईल. कुंभ राशि (Aquarius) आणि पूर्वभाद्रपद नक्षत्रात (Purva bhadrapada constellation) लागणारे हे एक पूर्ण चंद्र ग्रहण होण्याचे हे एक दुर्लभ संयोगचं (rare coincidence) आहे.

चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास ​​२८ मिनिटांचा असून,  चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त परिणाम रात्री ११:०१ ते १२:२२ दरम्यान दिसून येणार आहे. यादरम्यान, रात्री ११.४२ वाजता चंद्रग्रहण त्याच्या शिखरावर असेल.

भारतीय प्रमाण वेळेनुसार, चंद्र ग्रहणाला रविवार, दि. 7 सप्टेंबर रात्री 9.58 वाजता प्रारंभ होईल आणि  याची समाप्ती 1.26 वाजता  होईल. मध्यरात्री 11.42 वाजता आकाशात (SKY) पूर्ण चंद्र ग्रहण दिसणार आहे.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *