जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद देवदत्त तुंगार यांची माहिती
द सोलापूर ||
सोलापूर : महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या संकेतस्थळावर www.mahasainik.maharashtra.gov.in या लिंकवर जाऊन महाराष्ट्र युनिफाईड सिटिझन डेटा हब (MH-UCDH) पोर्टलवर माजी सैनिक व युद्धविधवांनी आपला युजर आयडी आणि पासवर्ड तयार करणे अनिवार्य आहे. या युजर आयडी व पासवर्ड शिवाय कल्याणकारी निधीअंतर्गत आर्थिक मदत मिळवणे शक्य होणार नाही, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद देवदत्त तुंगार (नि.) यांनी कळविले आहे.
प्रक्रिया कशी करावी?
- लाभार्थ्यांनी जवळच्या नेट कॅफेमध्ये जाऊन किंवा स्वतःच्या मोबाईलवर MH-UCDH पोर्टलवर लॉगिन करून युजर आयडी व पासवर्ड तयार करावा.
- त्यानंतर पोर्टलवर लॉगिन करून आवश्यक माहिती भरावी.
- पात्र लाभार्थ्यांनी आर्थिक मदतीचे प्रकरण जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावे.
महत्त्वाची सूचना
सोलापूर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक व युद्धविधवा यांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, जेणेकरून कल्याणकारी निधी अंतर्गत लाभ घेता येईल, असे जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीने कळविण्यात येत आहे.

