माजी सैनिक, पत्नी, पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कार’ अर्ज प्रक्रिया सुरू

अर्ज सादर करण्याची दि. २४ सप्टेंबर अंतिम तारीख

द सोलापूर ||

सोलापूर :  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी सैनिक, त्यांच्या पत्नी व पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कार’ देण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी दि. २४ सप्टेंबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद देवदत्त तुंगार (नि.) यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर  ( दूरध्वनी: ०२१७ – २९९२३६६) येथे संपर्क साधावा.

 

पुरस्कारासाठी पात्रता:

  •  राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू व पुरस्कार विजेते
  • साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य, संगणक, उद्योजकता व आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य
  • देश-राज्याची प्रतिष्ठा वाढवणारे योगदान
  • शैक्षणिक क्षेत्रात दहावीत ९०%, बारावीत ८५% पेक्षा अधिक गुण, पदवी/पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांक, IIT/IIM/AIIMS प्रवेशित विद्यार्थी

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:

वैयक्तिक अर्ज :

  • विहित नमुन्याचा फॉर्म (डी.डी. ४०) – कार्यालयात उपलब्ध
  • बोनाफाईड दाखला
  • मार्कशीटची प्रमाणित प्रत
  • ओळखपत्राची छायांकित प्रत
  • डिस्चार्ज बुकमधील फॅमिली डिटेल पानाची झेरॉक्स
  • बँक पासबुकची पहिल्या पानाची प्रत
  • आधारकार्ड प्रत
  • कार्याची पुष्टी करणारी प्रमाणपत्रे, वर्तमानपत्रातील प्रसिद्धी, फोटो इ.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख:
  • दि. २४ सप्टेंबर २०२५: त्यानंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *