सोलापूर दिनांक, ११ ऑगस्ट २०२५
देशातील लोकशाहीवर गदा आणणाऱ्या “वोट चोरी” प्रकरणाचा मुद्दा आता थेट जनतेसमोर नेण्याचे काँग्रेसने पाऊल उचलले असून सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलेल्या सविस्तर मुलाखतीत निवडणूक प्रक्रियेतील गंभीर त्रुटी आणि भाजपच्या कारस्थानांचा पर्दाफाश केला आहे ते शहर व जिल्ह्यातील लोकांपर्यंत पोहोचवणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सातलिंग शटगार व सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे म्हणाले की, वोट चोरी बाबत राहुल गांधी यांची मुलाखत वेगवेगळ्या सोशल मिडिया माध्यमाद्वारे जवळपास पंधरा कोटी लोकांनी पाहिली आहे. लोकांमध्ये या वोट चोरून सत्तेवर आलेल्या मोदी आणि फडणवीस बद्दल प्रचंड चीड निर्माण झाली आहे. राहुल गांधी यांची ही मुलाखत सोलापूर शहरातील विविध ठिकाणी मोठ्या स्क्रीन आणि प्रोजेक्टरवर दाखवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. जनतेच्या मतदानाचा अपमान आणि निवडणुकीतील अन्यायकारक पद्धतींविरोधात जागृती करणे हे आमचे कर्तव्य आहे, लोकांना सत्य परिस्थितीची जाणीव करून देऊन लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी राहुल गांधी लढत आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून सोलापूर शहरातील काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना साथ देणार आहेत

यावेळी बोलताना सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सातालिंग शटगार म्हणाले की, या वोट चोरीच्या फर्दाफाश मोहिमेच्या माध्यमातून लोकांपर्यंत वोट चोरी बाबत सत्य पोहोचवून, भाजपच्या कथित गैरकृत्यांबाबत जनजागृती केली जाणार आहे. “वोट चोरी करून सत्तेत आलेले मुख्यमंत्री आणि पंतप्रधान हे लोकशाहीचे अपमानकर्ते आहेत. आता जनतेला त्यांचा खरा चेहरा दाखविणार आहोत. ही मोहीम ही केवळ राजकीय आंदोलन नाही तर लोकशाहीच्या अस्तित्वासाठीची लढाई आहे, ज्यातून प्रत्येक नागरिकाला मतदान प्रक्रियेतील सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली जाणार आहे.

यावेळी कार्याध्यक्ष हणमंतु सायबोळू महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे,ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपडंला सेवादल यंग ब्रिगेड युवक अध्यक्ष विवेक खन्ना उपाध्यक्ष आबांदास गुत्तीकोंडा बसवराज म्हेत्रे अनिल मस्के माजी महिला अध्यक्ष अँड, करीमुनिसा बागवान हेमाताई चिंचोळकर सुमन जाधव भारती ईप्पलपल्ली जनरल सेक्रेटरी केशव इंगळे लखन गायकवाड संजय गायकवाड, नूरअहमद नालवार परशुराम सतारेवाले शिवशंकर आजंनाळकर सुनील सारंगी सुभाष वाघमारे, राजेश झंपले हाजी मलंग नदाफ मुमताज ताबोंळी चंदा काळे रेखा बिनेकर, ज्योती गायकवाड, मुमताज शेख विजयालक्ष्मी झाकणे प्रियंका कुंडला रमेश जाधव मल्लेश सुर्यवंशी आप्पा सलगर शिवाजी साळुंखे मोहसीन फुलारी अभिलाष अच्युकटला, आदी उपस्थित होते.
