सोलापुरात “RTO” ची “ MH-13 EW” नवी मालिका सुरु!

दुचाकी वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज  करण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

 द सोलापूर||

सोलापूर : दुचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या MH-13 EW” या नव्या  मालिकेतील आकर्षक  नोंदणी क्रमांक राखून ठेवण्यासाठी अर्ज स्विकारण्याबाबत प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.  दुचाकी वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.

वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयात  (Regional Transport Office) गर्दी होतेत्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो व नागरिकांनाही याचा त्रास होतोनागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक (Attractive registration number) उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने मिळावा, यासाठी ज्या दुचाकी वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहीत शुल्क भरून हवे असतील, त्यांनी दि. 19 ऑगस्ट 2025 या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी  4 या वेळेत विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावाकार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डीडी , पत्याचा पुरावाओळखपत्रपॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावाडीडी फक्त  ” Dy R.T.O. SOLAPUR” यांच्या नावे नॅशनलाईज बँकेचा असावा. अर्जासोबत पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल.

एक नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दि. 19 ऑगस्ट 2025 रोजी सायं5 वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल.  यादीतील अर्जदारांना लिलावाकरिता जर जास्त रक्कमेचा डी.डी. जमा करावयाचा असेल, त्यांनी दि20 ऑगस्ट 2025 रोजी  सीलबंद लिफाफ्यात दुपारी 2  वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत जमा करावालिलावासाठी (auction) सादर केलेला डीडी  1000/- रुपये पेक्षा कमी रकमेचा नसावादि. 20 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 4 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारीसोलापूर यांच्या उपस्थितीत संबंधित अर्जदारासमोर लिफाफे उघडून ज्या अर्जदाराचे विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डी.डी. सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाहीनोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 180 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर करून वाहन क्रमांक प्राप्त करून घ्यावा. अन्यथा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकारजमा होईलकोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली  फी कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांनी पत्रकान्वये  कळविले आहे

दुचाकी वाहनांच्या मालिकेचे वेळापत्रक (MH 13 EW):

  • दि. 19  ऑगस्ट  2025 : तिप्पट शुल्काचे अर्ज व परिवहन संवर्ग वाहनांसाठी नियमित अर्ज स्विकारणे   वेळ : 11 ते 4.
  • दि19 ऑगस्ट  2025 : सायंकाळी 5 वाडबल आलेल्या अर्जांची यादी जाहीर.
  • दि20 ऑगस्ट 2025 : दुपारी 2 वाजेपर्यंत बंद लिफाफ्यात लिलावासाठीचे डी.डी. स्विकारणे
  • रु1000/- पेक्षा जास्त रकमेचे डीडी जमा करणे गरजेचे.
  • दि.20 ऑगस्ट  2025 : तिप्पट आलेल्या शुल्काच्या अर्जासाठी व परिवहन संवर्ग वाहनांसाठी आलेल्या डबल अर्जाचा लिलाव दुपारी 4 वाजता.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *