The Agriculture Minister reached the farmers’ dam directly during heavy rains!
सोलापूरमध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा पाहणी दौरा!
द सोलापूर ||
Inspection visit of Agriculture Minister Dattatreya Bharane: गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी (Inspection of areas affected by heavy rains) सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागाची पाहणी केली. विशेष म्हणजे भर पावसातही कृषीमंत्र्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन त्यांनी (Communication with farmers) शेतकऱ्यांशी संवाद साधला.

कृषीमंत्र्यांनी (UNDERGAON, MADHA) माढा तालुक्यातील उंदरगाव व (PASALEWADI& NANDGAON, MOHOL)मोहोळ तालुक्यातील पासलेवाडी आणि नांदगाव यासह दोन्ही तालुक्यातील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी केली. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील, मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे, उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्यासह महसूल विभाग, पाणीपुरवठा विभाग, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मोहोळ तालुक्यातील पासलेवाडी व नांदगाव येथील (Household kit assistance to flood victims through MIT) पूरग्रस्त बाधितांना एमआयटी संस्थेमार्फत गृहपयोगी किट मदत म्हणून देण्यात आले होते. त्या किटचे वाटप कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते दोन्ही गावातील बाधित नागरिकांना यावेळी करण्यात आले.

