सैनिक कल्याण निधीसाठी युजर आयडी, पासवर्ड अनिवार्य!

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद देवदत्त तुंगार यांची माहिती

द सोलापूर ||

सोलापूर : महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग,  पुणे यांच्या संकेतस्थळावर  www.mahasainik.maharashtra.gov.in या लिंकवर जाऊन महाराष्ट्र युनिफाईड सिटिझन डेटा हब (MH-UCDH) पोर्टलवर माजी सैनिक व युद्धविधवांनी आपला युजर आयडी आणि पासवर्ड तयार करणे अनिवार्य आहे. या युजर आयडी व पासवर्ड शिवाय कल्याणकारी निधीअंतर्गत आर्थिक मदत मिळवणे शक्य होणार नाहीअसे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद देवदत्त तुंगार (नि.) यांनी कळविले आहे.

प्रक्रिया कशी करावी? 

  • लाभार्थ्यांनी जवळच्या नेट कॅफेमध्ये जाऊन किंवा स्वतःच्या मोबाईलवर MH-UCDH पोर्टलवर लॉगिन करून युजर आयडी व पासवर्ड तयार करावा.
  • त्यानंतर पोर्टलवर लॉगिन करून आवश्यक माहिती भरावी.
  • पात्र लाभार्थ्यांनी आर्थिक मदतीचे प्रकरण जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावे.

महत्त्वाची सूचना 

सोलापूर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक व युद्धविधवा यांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावीजेणेकरून कल्याणकारी निधी अंतर्गत लाभ घेता येईलअसे जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीने कळविण्यात येत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *