नारळी पौर्णिमेनिमित्त अखिल भारत पद्मशाली युवक संघमचा उपक्रम
कलाकार विपुल विपुल मिरजकरसह ३० जणांचे योगदान
द सोलापूर||
सोलापूर : नारळी पौर्णिमेनिमित्त अखिल भारत पद्मशाली युवक संघम यांच्यावतीने श्री मार्कंडेय महामुनी यांची भव्य-दिव्य प्रतिमा साकारण्यात आली आहे. ही 160 × 260 फूट आकारमानाची कलाकृती आहे. खडी व प्लास्टिक पेंटच्या साहाय्याने फक्त 22 दिवसांत पूर्ण करण्यात आली आहे.

ही कलाकृती साकारण्यासाठी या कालावधीत 5 कलाकार आणि 25-30 सहाय्यक यांनी मनापासून योगदान दिले आहे.
रविवार पेठेतील कुचन प्रशालेत ही कलाकृती साकारण्यात आली आहे. कलाकार विपुल मिरजकर यांच्यासह शुभम सब्बन, हाबेल चव्हाण, अखिल बुरा, रोहन आडम आदींनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
ही संकल्पना अध्यक्ष श्रीनिवास संगा व सचिव महेश जिंदम यांची असून, चित्रकार विपुल मिरजकर आणि त्यांच्या टीमने ती साकारली आहे.


